पोपट या पक्ष्याविषयी माहिती | Parrot information in marathi
Parrot information in marathi : जगातील सुंदर पक्षांमध्ये पोपटाला गणले जाते. जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा मुख्यतः उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये आढळतो. हा पक्षी बुद्धिमान पक्षी सुद्धा आहे. तो कोणाचीही नक्कल अगदी सहजपणे करू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण पोपट या पक्ष्याविषयी माहिती (Parrot information in marathi) जाणून घेणार आहोत. पोपट या पक्ष्याविषयी माहिती (Parrot information in marathi): सामान्य नाव (Common Name): पोपट (Parrot) वैज्ञानिक नाव (Scientific Name): Psittaciformes प्रजातींची संख्या : 393 समूह : Pandemonium पोपट पक्षाविषयी काही रोचक तथ्य (Facts about parrot in marathi) 1) पोपट पक्षी एक विश्वासघाती पक्षी म्हणून ओळखला जातो. कारण आपण याला कितीही काळापर्यंत पाळीव ठेवले तरीही, जेव्हा आपण त्याला पिंजऱ्याच्या बाहेर सोडतो तेव्हा तो मालकाकडे पलटून बघत सुद्धा नाही. 2) पोपट हा एकमेव असा पक्षी आहे जो पायाचा उपयोग करून आपल्या चोची पर्यंत अन्न नेऊ शकतो. 3) पोपट पक्षी आपल्या प्रमाणे त्यांच्या पिल्लांची नावे ठेवतो. आणि ती नावे जीवन भरासाठी असत...